maharashtra

आमदारांच्या विशेष प्रयत्नातून हासेवाडी रस्त्याचे निकृष्ठ कांमाचा फलक ही झळकला

फलक लागला पण जबाबदारी कोणाची?

Due to the special efforts of the MLAs, the panel of inferior work of Hasewadi road also shone
स्थानिक ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांच्याकडे तक्रार दिली व चौकशीसाठी विनंती केली.त्याप्रमाणे हासेवाडी येथे जाऊन पाहणी केली असता उपरोक्त  रस्त्याचे काम टेंडरमध्ये दिलेल्या निकषांप्रमाणे नाही. एम-२० ग्रेडचे कॉक्रिटीकरण फक्त कागदोपत्री दाखवण्यात आले आहे. सध्या रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे. त्या कॉक्रिटची जाडी तीन इंचाने कमी आहे.

         ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण अशी ओळख असलेल्या शिवसेना पक्षात अनेक मातब्बर लोकप्रतिनिधी आहेत. पण कोरेगाव मतदारसंघात चक्क   आमदारांच्या विशेष प्रयत्नातून हासेवाडी रस्त्याचे निकृष्ठ कांमाचा फलक ही झळकवुन दिशाभुल होत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत.                                                 

   कोरेगाव तालुक्यातील हासेवाडी गावातील  रस्ता घाई गडबडीत बनविण्यात आलेला होता.याबाबत बांधकाम व्यावसायिक संबधित कामांचा आढावा घेण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांच्याकडे तक्रार दिली व चौकशीसाठी विनंती केली.त्याप्रमाणे हासेवाडी येथे जाऊन पाहणी केली असता उपरोक्त  रस्त्याचे काम टेंडरमध्ये दिलेल्या निकषांप्रमाणे नाही. एम-२० ग्रेडचे कॉक्रिटीकरण फक्त कागदोपत्री दाखवण्यात आले आहे. सध्या रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे. त्या कॉक्रिटची जाडी तीन इंचाने कमी आहे. सदर कामातील शिफारशीनुसार देण्यात आलेली मजूर संस्था,ठेकेदार व  सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघड झाला आहे. अशी धारणा झाली आहे. शासनाचे पैशाचा गैरवापर झाला आहे .त्या सर्वांची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषी आढळल्यास संबधित ठेकेदाराला काळया यादीमध्ये (Black List) तात्काळ समाविष्ट करण्यात यावा.तसेच  सदर सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा? या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष     महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रमेश अनिल उबाळे यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला.

        या रस्त्याच्या कडेला.आ. महेशदादा शिंदेसाहेब यांचे विशेष प्रयात्तातून २५१५ अंतर्गत कामे सन-२०१९-२० कामाचे नाव-मौजे हासेवाडी ता.कोरेगाव येथे जि.प.शाळाते मरिआई मंदिर पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे. ता. कोरेगाव जि.सातारा कामाची किमंत-रू.२.५० लक्ष.मक्तेदाराचे नाव-चे.जरंडेश्वर म. स. संस्था मर्या कोळकी, फलटण काम सुरू दि.- ३१ जुलै २०२० काम पूर्ण दि.-१७ फेब्रुवारी २०२१कार्यान्वयीन यंत्रणा कार्यकारी अभियंता ,सा.बां. विभाग सातारा.असा फलक लावण्यात आला आहे.