maharashtra

पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या हस्ते फलटण ग्रामीण च्या अधिकारी व कर्मचार्‍यांचा गौरव


Honoring the officers and employees of Phaltan Grameen at the hands of Superintendent of Police Ajay Kumar Bansal
फलटण पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी धन्यकुमार गोडसे, चार पोलीस अधिकारी आणि 20 पोलीस अंमलदार यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशंसापत्र देऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी गौरविले आहे.

सातारा : फलटण पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी धन्यकुमार गोडसे, चार पोलीस अधिकारी आणि 20 पोलीस अंमलदार यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशंसापत्र देऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी गौरविले आहे.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे आणि इतर अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा अधीक्षकांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन स्थापन झाल्यापासून प्रथमच धन्यकुमार गोडसे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या दमदार कामगिरीचा गौरवपूर्वक उल्लेख करत पोलीस अधीक्षक सातारा यांनी प्रशंसापत्र देऊन गौरविले. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर मागील पाच महिन्यांमध्ये फलटण ग्रामीण पोलीसांनी अवैध धंद्याचे कंबरडे मोडले आहे. ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कंपनीच्या डीपी ची चोरी, नीरा नदीवरील व विहिरीवरील मोटार चोरीचे गुन्हे उघडकीस आणून या गुन्ह्यांना आळा बसवला. अवैध दारू विक्री करणार्‍यांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्याचप्रमाणे फलटण तालुक्यात अवैध खासगी सावकारी व्यवसाय सुरू होता. परंतु त्याबाबत तक्रार देण्यास कोणताही तक्रारदार पुढे येत नव्हता. पोलीस निरीक्षक गोडसे यांनी फलटण तालुक्यातील लोकांना आवाहन करीत पीडितांना तक्रार देण्यास सांगितले होते. त्यानुषंगाने सावकारी पाशाचे एकूण सहा गुन्हे दाखल केले असून यामध्ये चार जणांना अटक केली आहे. तसेच यापुढे लोकांनी भयभीत न होता तक्रार देण्यास ग्रामीण पोलीस स्टेशनने आवाहन केले आहे.
फलटण तालुक्यात कत्तलीसाठी गोवंश जनावरांची अवैधरित्या वाहतूक सुरू होती. गोडसे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गोपनीय माहिती घेऊन जनावरांची वाहतूक करणार्‍यांना पकडून सहा गुन्हे दाखल केले आहेत व इतर ही गुन्हे उघडकीस आणले असून फलटण पोलीस ग्रामीण चे निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्याबरोबर त्यांना सहकार्य करणारे चार पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व पोलिस पाटलांचा प्रशस्तीपत्र देऊन व सन्मान देऊन जिल्हा पोलीस प्रशासनांने त्यांचे मनोबल वाढवले आहे.
गोडसे यांच्या बरोबर सहा.पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, दत्तात्रेय दराडे, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, स्वाती धोंगडे, सहाय्यक पोलीस फौजदार सूर्यवंशी, शिंदे, पो.हवा.टिळेकर, साबळे, हांगे, कर्णे, कदम, लिमण, यादव, खाडे, पेंदाम, पोलीस नाईक सुर्यवंशी, गायकवाड, रणपिसे, काशीद, पो.कॉ.जगदाळे, अवघडे, विरकर, शेख, गायकवाड व पोलीस पाटील यांचाही यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.