बारा डबरी वसाहतीत दोन कुटूंबात मारामारी
कुऱ्हाड, कोयता व लोखंडी गजाचा वापर : तिघेजण जखमी, चौघांवर गुन्हा दाखल
येथील बारा डबरी वसाहतीत कुऱ्हाड, कोयता व लोखंडी गजाने दोन कुटूंबात मारामारी झाली. यामध्ये तिघेजण जखमी झाले आहे. मंगळवारी १५ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी चौघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कराड : येथील बारा डबरी वसाहतीत कुऱ्हाड, कोयता व लोखंडी गजाने दोन कुटूंबात मारामारी झाली. यामध्ये तिघेजण जखमी झाले आहे. मंगळवारी १५ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी चौघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असिफ अब्बास मुल्ला, अल्ताफ अब्बास मुल्ला, हुसेन अब्बास मुल्ला व दिलशाद हुसेन मुल्ला सर्व रा. बाराडबरी झोपडपट्टी, कराड अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी फतिमा जावेद खसगी यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कराड येथील बारा डबरी परिसरात वास्तव्यास असणाऱ्या खसगी कुटूंबातील एका महिलेची दिलशाद मुल्ला बदनामी करीत असल्याचे खसगी कुटूंबियांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे मंगळवारी सकाळी याबाबतचा जाब विचारण्यासाठी मालनबी खसगी, सलीम खसगी, शाहरूख खसगी हे तिघेजण दिलशाद मुल्ला हिच्या घरी गेले होते. त्यावेळी दिलशाद हिने शिविगाळ करीत मालनबी यांना मारहाण केली. तसेच इतर आरोपींनी या तिघांना कुऱ्हाड, कोयता व लोखंडी गजाने मारहाण केली. त्यामध्ये ते जखमी झाले. परिसरातील नागरीकांनी जखमींना तात्काळ उपचासाठी वेणूताई चव्हाण शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबतची नोंद कराड शहर पोलीस आठण्यात झाली आहे. त्यानुसार चौघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.


