वाई येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या ३७ कोटी ४६ लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेचे संस्थापक नंदकुमार खामकर यांच्यासह २९ जणांवर गुन्हा दाखल असून याप्रकरणात पाच जणांना आर्थिक गुन्हे शाखेने काल अटक केल्यानंतर त्यांना आज सातारा येथील सत्र न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवस पोलीस कोठडी ठोठावली.
सातारा : वाई येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या ३७ कोटी ४६ लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेचे संस्थापक नंदकुमार खामकर यांच्यासह २९ जणांवर गुन्हा दाखल असून याप्रकरणात पाच जणांना आर्थिक गुन्हे शाखेने काल अटक केल्यानंतर त्यांना आज सातारा येथील सत्र न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवस पोलीस कोठडी ठोठावली.
हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक काल वाई येथे आले होते. त्यांनी रमेश ज्ञानेश्वर खामकर, ऍड ललित सूर्यकांत खामकर, ऍड अविनाश अशोक गाडे, तुषार सखाराम चक्के, अमोल खोतलांडे यांना ताब्यात घेतले. या पाच जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर मुख्य संशयित बँकेचे संस्थापक नंदकुमार खामकर स्वतः सातारा येथील न्यायालयात हजर झाले. त्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
या घोटाळ्यात २९ जणांवर गुन्हा दाखल आहे. यापूर्वीच बँकेचे सरव्यवस्थापक रमेश दगडू जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे. घोटाळ्यातील अटक केलेले संशयित ॲडव्होकेट ललित खामकर, तुषार चक्के, रमेश खामकर, अमोल खोतलांडे, अविनाश गाडे यांना सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. तर यातील मुख्य आरोपी नंदकुमार खामकर याला जामीनासाठी आज गुरुवार दि. १७ रोजी सातारा जिल्हा सत्र न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे.


