शाहूपुरीत माळवाडी येथे राहणाऱ्या युवकाचा उरमोडी धरणाच्या सांडव्याच्या पाण्यात पोहताना बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. आलोक संतोष शिंदे वय १८, रा. माळवाडी रोड शाहूपुरी असे त्यांचे नाव आहे. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : शाहूपुरीत माळवाडी येथे राहणाऱ्या युवकाचा उरमोडी धरणाच्या सांडव्याच्या पाण्यात पोहताना बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. आलोक संतोष शिंदे वय १८, रा. माळवाडी रोड शाहूपुरी असे त्यांचे नाव आहे. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली माहिती अशी, मंगळवारी दुपारी तो मित्रांसोबत उरमोडी धरणावर फिरायला गेला होता. यावेळी पाण्यात पोहताना तो बुडाला. त्याला ग्रामस्थांच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढून तातडीने क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत त्याचा चुलत भाऊ संदीप संपत शिंदे रा. पाटखळ यांनी तालुका पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.


