maharashtra

हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी पाच जणांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

मुख्य संशयित नंदकुमार खामकर सातारा न्यायालयात हजर

Five arrested in Harihareshwar Sahakari Bank scam
येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या ३७ कोटी ४६ लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेचे संस्थापक नंदकुमार खामकर यांच्यासह २९ जणांवर गुन्हा दाखल असून याप्रकरणात पाच जणांना आज आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

वाई : येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या ३७ कोटी ४६ लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेचे संस्थापक नंदकुमार खामकर यांच्यासह २९ जणांवर गुन्हा दाखल असून याप्रकरणात पाच जणांना आज आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक आज वाईत आले होते. त्यांनी रमेश ज्ञानेश्वर खामकर, ऍड ललित सूर्यकांत खामकर, ऍड अविनाश अशोक गाडे, तुषार सखाराम चक्के, अमोल खोतलांडे यांना ताब्यात घेतले. या पाच जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर मुख्य संशयित बँकेचे संस्थापक नंदकुमार खामकर स्वतः दुपारी सातारा येथील न्यायालयात हजर झाले. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक मोहन शिंदे यांनी केली. या कारवाईत विक्रम कणसे, मनोज जाधव, अजित पवार, प्रसाद जाधव, संजय मोरे यांनी सहभाग घेतला. या घोटाळ्यात २९ जणांवर गुन्हा दाखल आहे. यापूर्वीच बँकेचे सरव्यवस्थापक रमेश दगडू जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे.