maharashtra

नागेवाडी फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन ठार

एक गंभीर; चारचाकी वाहनाची पिकअप व्हॅनला धडक

Two killed in road mishap near Nagewadi
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर  झालेल्या विचित्र अपघातात एक जण जागीच ठार, तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्य झाल्याची खळबळजनक घटना घडली. दोन जणांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर  झालेल्या विचित्र अपघातात एक जण जागीच ठार, तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्य झाल्याची खळबळजनक घटना घडली. दोन जणांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे अपघातामध्ये जखमी व्यक्तीचा पाय घटनास्थळी पाय तुटून पडल्याचे ह्रदय हेलवणारे चित्र दिसून आल्याने अपघाताची तीव्रता समजून येत आहे.  
समाधान मोहन कांबळे वय (वर्षे 28, रा. उमरगा यल्लादेवी, ता. अहमदपूर, चाकोली जि. लातूर) हा जागेवरच मयत झाला असून वासुदेव नायर (वय 38, रा. भद्र ओरिसा) याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. 
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस निरीक्षक विश्वनाथ घोडके आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीतील नागेवाडी फाट्याजवळ महामार्गावर पिकअप वाहनाचे पंक्चर रस्त्यावरच काढलं जात होते. तेव्हा पाठीमागून आलेल्या एका चारचाकी  (एम एच १२ जीव्ही ३५१५) चारचाकी वाहनाने पिकअपला जोरदार धडक दिली. दुपारी ३.३० ते ४  वा सुमारास हा अपघात झाला तो इतका भीषण होता की यामधील एकाचा जागेवर मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा पाय तुटून रस्त्यावरच पडला. या अपघाताची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. यातील गंभीर जखमी असलेल्या वासुदेव नायर ला साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान गंभीर जखमी असलेल्या नायरचा मृत्यू झाला आहे.  पुढील सोपस्कार करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात शव आणून शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.