maharashtra

श्री शिवनाथ  मुळे, (गुरूजी) यांची चेअरमन पदी निवड 

सलग ६ व्यांदा सातारा जिल्हा संत नामदेव पतसंस्थेच्या चेअरमन पदी निवड 

Shri. Shivnath, Mule (Guruji) was elected as the Chairman of Satara District Sant Namdev Patsanstha for the 6th time
नुकत्याच झालेल्या सातारा जिल्हा संत नामदेव सहकारी पतसंस्था मर्यादित , सातारा पंचवार्षिक निवडकीचे सर्व  जागा बिनविरोध झाल्या असून श्री. शिवनाथ जगन्नाथ मुळे  यांची सलग सहाव्यांदा संस्थेच्या चेअरमन पदी निवड झाली

सातारा 
नुकत्याच झालेल्या सातारा जिल्हा संत नामदेव सहकारी पतसंस्था मर्यादित , सातारा पंचवार्षिक निवडकीचे सर्व  जागा बिनविरोध झाल्या असून श्री. शिवनाथ जगन्नाथ मुळे  यांची सलग सहाव्यांदा संस्थेच्या चेअरमन पदी निवड झाली असून श्री. शिवनाथ मुळे  यांचे कारकिर्दीमध्ये सलग ३० वर्षे सभासदांना लाभांश देत आहे. श्री. शिवनाथ मुळे  हे सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कार्यरत असून केशवराज ट्रस्ट, पंढरपूर ( संत नामदेव मंदिर   ) मध्ये विश्वस्त ,  नामदेव समाजोन्नती परिषदेचे व राष्ट्रीय  O.B.C. महासंघ महाराष्ट्र राज्य, खजिनदार तसेच जीवनातील मुख्यकाल प्राथमिक शिक्षक व  मुख्याध्यापक या पदावर काम करत आहेत.  सातारा जिल्हा संत नामदेव पतसंस्थेचे सलग ३० वर्षे  बिनविरोध निवड झाली तसेच निवडीपासून सलग ६ व्यांदा चेअरमन पदी निवड झालेबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून श्री शिवनाथ मुळे, गुरूजी याना शुभेच्या दिल्या आहेत. 


    सातारा जिल्हा संत नामदेव पतसंस्थेच्या चेअरमन श्री. शिवनाथ मुळे,पुसेसावळी , व्हा. चेअरमन, सोपान काकडे, मोरगिरी, चंद्रकांत शेळके, सातारा, धनंजय बारटक्के, सातारा, कमलाकर कालेकर, कोरेगाव , धनंजय  खटावकर, मेढा, चंद्रकांत खटावकर, रहिमतपूर, सचिन औधकार, कराड, उमेश बगाडे , महाबळेश्वर , अश्विनी गाडेकर, सातारा, देवकी बारटक्के, सातारा असे संचालक पदी बिनविरोध निवड झाली.