पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिणच्या डोंगरकपारीपर्यंत विकास केला
इंद्रजित चव्हाण : काजारवाडी-गोटेवाडी साकव पूलाच्या कामाचे भूमिपूजन, 50 लाख 25 हजारांचा निधी
काजारवाडी ते गोटेवाडीला जोडणाऱ्या साकव पुलाच्या कामासाठी ४ वर्ष अविरतपणे पाठपुरावा सुरू होता. हे काम करण्याचे आपले कर्तव्य असल्याचे सांगत पृथ्वीराज बाबांनी कराड दक्षिणच्या डोंगरकपारीपर्यंत निधी पोहचवत विकास केला आहे. बाबांच्या माध्यमातून आत्तापर्यंत दक्षिणेत अनेक कामे केली असून यापुढेही आणखी कामे करू, असे मत इंद्रजित चव्हाण यांनी व्यक्त केले.
कराड : कोरोनाच्या संकटामुळे विकासकामे राबवताना मर्यादा आल्या. तरीही काजारवाडी ते गोटेवाडीला जोडणाऱ्या साकव पुलाच्या कामासाठी ४ वर्ष अविरतपणे पाठपुरावा सुरू होता. हे काम करण्याचे आपले कर्तव्य असल्याचे सांगत पृथ्वीराज बाबांनी कराड दक्षिणच्या डोंगरकपारीपर्यंत निधी पोहचवत विकास केला आहे. बाबांच्या माध्यमातून आत्तापर्यंत दक्षिणेत अनेक कामे केली असून यापुढेही आणखी कामे करू, असे मत इंद्रजित चव्हाण यांनी व्यक्त केले.
काजारवाडी-येवती ता. कराड येथे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून 50 लाख 25 हजार रुपये खर्चातून होणाऱ्या गोटेवाडीकडील साकव पुलाच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कराड दक्षिण सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, कराड दक्षिण काँग्रेसचे उपाध्यक्ष नितीन थोरात, येवती ग्रामपंचायत सदस्य सचिन मोहिते, खाशाबा मोहिते, गणपत मोहिते, मारुती मोहिते, पांडुरंग मोहिते, सुरेश मोहिते, शिधु मोहिते, शामराव मोहिते, वसंत मोहिते, सदाशिव मोहिते, रघुनाथ मोहिते, शंकर मोहिते, प्रवीण मोहिते, संतोष माने, शंकर शेवाळे, बाजीराव शेवाळे, दत्तू मोहिते, जालिंदर मोहिते, विकास मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
चव्हाण म्हणाले, शेवाळेवाडी (येवती) येथे पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून सभामंडपाचे काम मंजूर झाले आहे. कराड दक्षिणेच्या अनेक गावात बाबांच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली आहेत. पृथ्वीराज बाबांच्या पाठीशी सर्वजण ताकदीने उभा राहून काँग्रेसच्या माध्यमातून विकास करू या. काँग्रेसने देशाचा शाश्वत विकास केला. परंतु, सद्याचे राजकारण हे बेगडी स्वरूपाचे असून त्याला न भूलता विशेषतः तरुणांनी काँग्रेसची पाठराखण करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सचिन मोहिते म्हणाले, काजारवाडीतील ग्रामस्थांचा दळणवळणाचा मोठा प्रश्न होता. लग्नासाठी लाखो रुपये खर्चूनही येथील लोकांना वऱ्हाड जवळच्या शेवाळेवाडीत उतरून चालवत आणावे लागते. ही परिस्थिती बदलण्याची आम्हाला अपेक्षा होती. ती पृथ्वीराज बाबांनी जवळजवळ नव्वद टक्के पूर्ण केली आहे. आम्ही 2014 पासून बाबांच्या बरोबर आहोत. ग्रामस्थांची सर्व सोयींनीयुक्त काजारवाडी व्हावी, हे स्वप्न होते. साकव पुलाच्या निर्मितीमुळे दरवर्षी होणाऱ्या त्रासातून लोकांची सुटका झाली आहे. साकव पुलामुळे गावकऱ्यांची जवळजवळ स्वप्नपूर्ती होत असून बाबांनी येथील दत्त मंदिरासमोर सभामंडपासही निधी दिला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. सचिन मोहिते यांनी आभार मानले.