maharashtra

वाईत मशीनमध्ये अडकून महिलेचा मृत्यू


Woman dies after getting stuck in machine
वाईच्या एमआयडीसी मधील गरवारे वालरुप्स कंपनीच्या नेट प्रोसेस विभागात सौ.छाया संतोष बोधे (वय ३५, रा. रविवार पेठ, वाई) यांचा मशीनच्या दोरी मध्ये पाय अडकल्याने व त्या मशीनला वेग असल्याने दोरीसोबत त्या जमीनीपासून २० फुट ऊंचीवर असलेल्या मशीनमध्ये क्षणार्धात ओढल्या गेल्या. त्यांचा मशीनमध्ये अडकून जागीच मृत्यू झाल्याने कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

सातारा : वाईच्या एमआयडीसी मधील गरवारे वालरुप्स कंपनीच्या नेट प्रोसेस विभागात सौ.छाया संतोष बोधे (वय ३५, रा. रविवार पेठ, वाई) यांचा मशीनच्या दोरी मध्ये पाय अडकल्याने व त्या मशीनला वेग असल्याने दोरीसोबत त्या जमीनीपासून २० फुट ऊंचीवर असलेल्या मशीनमध्ये क्षणार्धात ओढल्या गेल्या. त्यांचा मशीनमध्ये अडकून जागीच मृत्यू झाल्याने कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे.
हा अपघात आज मंगळवार दि.१५ रोजी सकाळी ७.४० वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या अपघाताची माहिती वाईचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना समजताच त्यांनी तातडीने अपघात स्थळावर जाऊन परिस्थितीची पाहणी करुन तपासाच्या सुचना दिल्या. मृत महिलेचा पतीही याच कंपनीत कामाला आहे. या भीषण अपघातामुळे गरवारे कंपनीतील कामगारांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.