maharashtra

इतर वाहने शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न : भगवान निंबाळकर


Efforts on the battlefield to find other vehicles: Bhagwan Nimbalkar
२ कोटी ६५ लाख रुपये किमतीच्या २४ वाहनांची परस्पर विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर याच प्रकरणातील इतर वाहने शोधण्यासाठी सातारा शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे, अशी माहिती सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.

सातारा : २ कोटी ६५ लाख रुपये किमतीच्या २४ वाहनांची परस्पर विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर याच प्रकरणातील इतर वाहने शोधण्यासाठी सातारा शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे, अशी माहिती सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.
वाहने चालवण्यासाठी घेऊन त्यांची परस्पर विक्री करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना यश आल्याने टेम्पो, ट्रक व प्रवासी वाहतूक संघटनेच्यावतीने अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी निंबाळकर यांची भेट घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष रवी चव्हाण, अरुण कुमार पाटील, सचिन घाडगे, निखिल पाटील उपस्थित होते. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे संघटनेने समाधान व्यक्त केले आहे.