कराड- ढेबेवाडी मार्गावर भरधाव पोलीस गाडीने चौघांना उडवले. कुसूर (ता. कराड) गावच्या हद्दीत झालेल्या या अपघातात एकजण जागीच ठार झाला असून एकजण गंभीर, तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.
अण्णासाहेब कल्याणी महाविद्यालयाची विद्यार्थीनी अलंकृता विजय कांबळे हिने शालेय धनुर्विद्या स्पर्धेत तिहेरी यश मिळवले.
सातारा नगरपरिषदेने हद्दवाढ भागातील मिळकत धारकांच्या मिळकत करांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. याची माहिती वसुली विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. दि. 25 ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर यादरम्यान वेगवेगळ्या भागांमध्ये या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांनी आपल्या दालनाबाहेर 'मी माझ्या पगारावर समाधानी आहे' अशा आशयाची पाटी लावल्याने पंचायत समितीत कामासाठी येणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सातारा शहराला वरदायिनी ठरणाऱ्या कास धरणाच्या नवीन जलवाहिनीच्या कामास पालिकेकडून प्रारंभ करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये मंगळवारी विजयादशमी दसरा सण साजरा होत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये सध्या खरेदीची लगबग सुरू असून दसरा निमित्त वेगवेगळ्या योजनांमध्ये ऑफर जाहीर झाल्या असून वाहन खरेदी, इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदी तसेच गृहप्रकल्प व्यवसायामध्ये तेजीचे वातावरण आहे.
खंडेनवमी निमित्त खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी प्रतापगडावरील भवानी मातेची विधीवत व पारंपारिक पद्धतीने पूजन केले आरोग्य धनधान्य समृद्धी नांदू दे, असे साकडे उदयनराजे यांनी यावेळी घातले. यावेळी गडावर विशेष होमहवनाचे आयोजन करण्यात आले होते.
चोरीस गेलेल्या दुचाकीचा छडा लावण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले असून याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
वाढे फाटा परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
एका खाजगी फायनान्स कंपनीत सुमारे चार लाखांच्या अफरातफर प्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.