गोडोली विलासपूर येथून मिळकतकराच्या तब्बल दोनशे तक्रारी
आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची येथील नागरिकांशी चर्चा
हद्दवाढ झालेल्या भागासह शहरातील सर्वच मिळकतधारकांना कर मागणीच्या नोटीसा पालिकेने दिल्या आहेत. नोटीसांच्या अनुषंगाने पालिकेने हरकती अगोदर घ्याव्यात, अशी विनंती आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्याधिकाऱ्यांना केली होती.
सातारा : हद्दवाढ झालेल्या भागासह शहरातील सर्वच मिळकतधारकांना कर मागणीच्या नोटीसा पालिकेने दिल्या आहेत. नोटीसांच्या अनुषंगाने पालिकेने हरकती अगोदर घ्याव्यात, अशी विनंती आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्याधिकाऱ्यांना केली होती. त्यानुसार सातारा पालिकेकडून गोडोली व विलासपुर येथे तक्रार स्वीकारण्याचे केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्या ठिकाणी गुरुवारी आमदार शिवेंद्रराजे यांनी भेट दिली. या केंद्रावर तब्बल दोनशे तक्रारी दाखल झाल्या आहेत. तेथे नागरिकांनी आपल्या तक्रारींचा पाढा आमदार शिवेंद्रराजे यांच्याकडे मांडला. त्यावर आमदार शिवेंद्रराजेंनी तक्रारीच्या अनुषंगाने मुख्याधिकारी अभिजित बापट यांना सूचना करतो, अशी ग्वाही दिली.
चतुर्थ वार्षिक पाहणीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पालिकेने गतवर्षी कर मागणीच्या नोटीसा सातारकरांना दिल्या होत्या. त्यावेळी आमदार शिवेंद्रराजे यांनी जुन्याच पद्धतीने कर आकारणी करावी, नवीन कर प्रक्रियेला स्थगिती द्यावी याकरता राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार स्थगिती देण्यात आली होती. यावर्षी पालिकेने कर मागणीच्या नोटीसा नागरिकांना दिल्या गेल्याने पुन्हा सातारकर नागरिकांमधून तीव्र नाराजी होती.
आमदार शिवेंद्रराजे सुचनेनुसार हद्दवाढीच्या भागात नागरिकांसाठी तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. विलासपुर, गोडोली येथे दोन दिवसात दोनशेहून अधिक पालिकेकडे दाखल झाल्या आहेत. दुपारी गोडोली येथील केंद्राला आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी भेट दिली. तेथील नागरिकांनी कर मागणी नोटीसीबाबत आलेलेले अनुभव आमदार शिवेंद्रराजे यांच्याकडे मांडले. आमदार शिवेंद्रराजे यांनी ज्या काही त्रुटी आहेत त्या संदर्भात मुख्याधिकारी अभिजित बापट यांना सुचना करतो, अशी ग्वाही दिली.


