अपघातात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : अपघातात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शेंद्रे ता.सातारा गावच्या हद्दीत वाहतुकीस अडथळा होईल असा ट्रक लावल्यानंतर त्यावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात आनंद निवृत्ती रणनवरे (वय 47, रा.कोडोली, सातारा) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तारिफ हुसेन रुस्तम खान (वय 23, रा.हरियाना) याच्या विरुध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 23 रोजी घडली आहे.


