सातारा तालुका पोलिसांनी अवैध दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई केली आहे.
सातारा : सातारा तालुका पोलिसांनी अवैध दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास अंगापूर, ता. सातारा गावच्या हद्दीतील अंगलाईनगर येथील राहत्या घराच्या आडोशाला नारायण रामराव कणसे हे अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आले. त्यांच्याकडून 840 रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. अधिक तपास पोलीस शिपाई डफळे करीत आहेत.