प्रकाश आंबेडकर हे तर्कविसंगत, बेलगाम वक्तव्य करतात. दृष्ट भावनेने भाजप, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर बेछुट टीका करतात. वंचित बहूजन आघाडीचा जीव किती, ताकद किती, या अंदाज न घेता मोदींवर अर्वाच्च भाषेत बोलणे अशोभनीय आहे. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ते आरोप करत असतात, अशी टीका भाजपचे माजी खासदार अमर साबळे यांनी केली.
सातारा : प्रकाश आंबेडकर हे तर्कविसंगत, बेलगाम वक्तव्य करतात. दृष्ट भावनेने भाजप, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर बेछुट टीका करतात. वंचित बहूजन आघाडीचा जीव किती, ताकद किती, या अंदाज न घेता मोदींवर अर्वाच्च भाषेत बोलणे अशोभनीय आहे. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ते आरोप करत असतात, अशी टीका भाजपचे माजी खासदार अमर साबळे यांनी केली.
येथील शासकीय विश्रामगृहात साबळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी उपस्थित होते.
प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी, मोहन भागवत यांना आमची सत्ता आली तर तुरुंगात डांबू असे विधान केले होते. त्यावर ते म्हणाले, प्रकाश आंबेडकर तर्कविसंगत, बेलगाम वक्तव्य करतात. कायम दृष्ट भावनेने भाजप, पंतप्रधान मोदी आणि मोहन भागवत यांच्यावर बेछुट टीका करतात. वास्तविक यांच्या वंचित बहूजन आघाडीचा जीव किती, ताकद किती, या अंदाज न घेता मोदी यांच्यावर अर्वाच्च भाषेत बोलणे अशोभनीय आहे. त्यांच्या राजकीय विचारसरणीचा अभ्यास केला तर त्यांचे सर्व आरोप हे बेछुट आणि तर्कविसंगत आहेत. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ते आरोप करत असतात. परंतु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्याचा वारसा त्यांना लाभला आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्यांमुळे कार्यकर्ते आणि समाजाची दिशाभल होवू नये, त्यांनी सावध रहावे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची, संस्कृतीची आणि मानवतेशी कायम प्रामाणिक राहून संविधानाची निर्मिती केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर करताना निजामच्या आमिषाला बळी पडून मुस्लिम झाले असते अथवा ब्रिटिशांच्या आमिषाला बळी पडून ख्रिश्चन झाले असते तर देशाचा देशाचा नकाशा बदलला असता. त्यांनी हे न करता बौध्द धर्म स्विकारला आणि मानवतेवर उपकार केले आहेत. त्यांचा वारसा सांगणारे प्रकाश आंबेडकर मात्र औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहतात. त्याचे हे वागणे निषेधार्ह आहे. प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहातात, यातून चुकीचा संदेश जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने डॉ. आंबेडकर यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून दीड लाख सेवा प्रकल्प उभे केले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी किती सेवा प्रकल्प राबवले आहेत, हे जाहीर करावे. मोदी यांनी प्रधान आवास योजना, आयुष्यमान भारत, किसान सन्मान अशा अनेक योजना राबवल्या. त्याचा लाभ अनेक वंचित व उपेक्षित वर्गाला झाला आहे. मोदी यांच्यामुळे पंतप्रधान आवास, आयुष्यमान योजना, किसान सन्मान अशा अनेक योजनांचा लाभ उपेषित वंचितांना मिळाला. मात्र, प्रकाश आंबेडकर यांचा राजकीदृष्ट्या अभ्यास केला तर त्यांचे आरोप बेछुट व सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहेत, हेच दिसते.
'इंडिया'त त्यांना घेत नाहीत
'इंडिया' आघाडीत प्रकाश आंबेडकर यांना कोणी घ्यायला तयार नाही. त्यामुळे सनसनाटी निर्माण करून आपली दखल घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांचा राजकीय इतिहास पाहिला तर त्यांना सोबत घ्यायला कोणी तयार नाही, अशी टीका करतानाच साबळे यांनी 'प्रकाश आंबेडकर हे पीएम मोदींवर हिटलरचा आरोप करतात, हे दुर्दैवी आहे,' अशीही खंत व्यक्त केली.


