maharashtra

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा


महिलेचा विनयभंग तसेच तिच्या पतीस मारहाण केल्याप्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : महिलेचा विनयभंग तसेच तिच्या पतीस मारहाण केल्याप्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी रामा तुकाराम दुबळे (रा.सातारा) याच्या विरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 23 रोजी घडली आहे. संशयिताने महिलेचा पाठलग करुन विनयभंग केला. यावेळी महिलेच्या पतीने संशयिताला जाब विचारल्यानंतर त्याने महिलेच्या पतीला मारहाण करुन जखमी केले.