अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरालगत वाढे फाटा येथे झालेल्या अपघात प्रकरणी ईश्वरगौडा बसनगौडा दौडगौडा (रा. कर्नाटक) याच्या विरुध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दि. 23 रोजी अपघात झाल्यानंतर संशयिताने भरधाव ट्रक चालवून तो धडकवला. या अपघातामध्ये ट्रकमधील क्लिनर जखमी झाला आहे.


