रयत शिक्षण संस्थेच्या सुमारे चार लाख साठ हजार विद्यार्थ्यांना केंब्रिज विद्यापीठाचे कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम अभ्यासण्याची संधी मिळणार आहे. रयत शिक्षण संस्था व केंब्रिज विद्यापीठाच्या शिष्टमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी साताऱ्यात पार पडली.
मराठा आरक्षण देणार नसाल तर निवडणुकांमध्ये याची जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा चे वरिष्ठ पदाधिकारी शरद काटकर यांनी दिला आहे.
महिलेचा विनयभंग तसेच तिच्या पतीस मारहाण केल्याप्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साताऱ्यातील शेटे चौकातील गुलमर्ग वाईन शॉपमध्ये खरेदी केलेल्या रॉयल स्टॅग कंपनीच्या दारुच्या बाटलीत आळ्या, किडे आढळून आलेले असून हा प्रकार म्हणजे दारु पिणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणारा आहे.
खा. उदयनराजे भोसले यांनी जितेंद्र डूडी यांच्याशी चर्चा केली. यावेळी खातेप्रमुख उपस्थित होते.
प्रकाश आंबेडकर हे तर्कविसंगत, बेलगाम वक्तव्य करतात. दृष्ट भावनेने भाजप, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर बेछुट टीका करतात. वंचित बहूजन आघाडीचा जीव किती, ताकद किती, या अंदाज न घेता मोदींवर अर्वाच्च भाषेत बोलणे अशोभनीय आहे. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ते आरोप करत असतात, अशी टीका भाजपचे माजी खासदार अमर साबळे यांनी केली.
सातारा तालुका पोलिसांनी अवैध दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई केली आहे.
गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.