आरफळ येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : आरफळ येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी दुपारी साडेतीन ते पावणेचार वाजण्याच्या सुमारास कृष्णा रामदास गोपनर रा. शेरेची वाडी, ता. फलटण यांची दुचाकी क्रमांक एमएच 11 सीटी 2868 अज्ञात चोरट्याने आरफळ गावच्या हद्दीतील ग्रीन गोल्ड हॉटेल जवळून चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गोरे करीत आहेत.


