maharashtra

आर्म अॅक्ट अंतर्गत पाच जणांविरोधात गुन्हा


आर्म अॅक्ट अंतर्गत पाच जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : आर्म अॅक्ट अंतर्गत पाच जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 24 रोजी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील गुरुवार बाग या ठिकाणी सुरज दत्ता गाडे,  प्रसाद गवळी, निलेश शिर्के (तिघेही रा. गुरुवार पेठ सातारा), ओंकार कुंभार आणि रोहित खंदारे (दोघे रा. माची पेठ सातारा) या पाच जणांनी हातात लोखंडी कोयता आणि लोखंडी पाईप घेऊन मोठमोठ्याने ओरडून हातातील कोयता व लोखंडी पाईप नाचवून दहशत निर्माण केली. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मते करीत आहेत.