maharashtra

प्रतापगड भेट सुखावह होणार

खा. उदयनराजे भोसले : तटबंदी दुरुस्तीसह इतर कामांसाठी १० कोटी

खा. उदयनराजे भोसले यांनी जितेंद्र डूडी यांच्याशी चर्चा केली. यावेळी खातेप्रमुख उपस्थित होते.

सातारा : खा. उदयनराजे भोसले यांनी जितेंद्र डूडी यांच्याशी चर्चा केली. यावेळी खातेप्रमुख उपस्थित होते.
सातारा : खंडेनवमीला प्रतापगडावर श्री तुळजाभवानीचे दर्शन व अभिषेक सोहळा पार पडला. या निमित्ताने तेथील प्रस्तावित कामे, पूर्णत्वास गेलेली कामे, मार्गी लागलेली कामे आणि काही नवीन कामांचा आढावा उदयनराजेंनी घेतला होता. त्यासंदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांची जितेंद्र डूडी यांची त्यांनी भेट घेतली. या बैठकीबाबत उदयनराजेंनी सोशल मीडियावर सांगितले आहे की, शिवप्रेमींना सांगण्यास आनंद होतो की, तुमची प्रतापगड भेट आता अधिक सुखावह होणार आहे. गडाच्या ढासळलेल्या तटबंदीची दुरुस्ती आणि इतर कामांसाठी १० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
खा. उदयनराजेंनी आज जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली. यावेळी प्रतापगड विकासाच्या अनुषंगाने त्यांची चर्चा झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, पोलीस उपअधीक्षक के. एन. पाटील यांच्यासह विविध विभागांचे खातेप्रमुख तसेच काका धुमाळ, उदयनराजे समर्थक उपस्थित होते.
खंडेनवमीला प्रतापगडावर श्री तुळजाभवानीचे दर्शन व अभिषेक सोहळ्यासाठी खा. उदयनराजे गेले होते. त्यावेळी त्यांनी तेथील प्रस्तावित कामे, पूर्णत्वास गेलेली कामे, मार्गी लागलेली कामे आणि काही नवीन कामांचा आढावा घेतला. गडाच्या ढासळलेल्या तटबंदीची दुरुस्ती आणि इतर कामांसाठी १० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण विभाग, एसटी महामंडळ यांच्याकडे प्रलंबित असलेली प्रतापगडावरील बहुतांश कामे पूर्ण झाली असून, उर्वरित कामे मार्गी लागली आहेत. गडावरील पाणीपुरवठ्याबरोबरच महाबळेश्वर ते प्रतापगड बससेवा सुरू करणे, दगडी पायऱ्या, तळयांचे संवर्धन, श्री भवानीमाता मंदिराभोवती फरशी आणि शेड, मंदिराच्या छताची गळती काढणे, मुख्य दरवाजा आणि अन्यत्र दिवाबत्ती तसेच जन्नित्र, भूमिगत जलवाहिनी, चौथरा, वाहनतळ, वाडा ते प्रतापगड रस्ता अशा सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहेत, असेही उदयनराजेंनी बैठकीनंतर सांगितले.

रोप-वे ड्रीम प्रोजेक्ट
प्रतापगडावरील रोप-वेसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आग्रही आहेत. धोम, पाचगणी, महाबळेश्वर, प्रतापगड असा बृहत रोप-वे प्रस्तावित असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी याबाबत पूर्वीच बोलणे झाले आहे. हा ड्रीम प्रोजेक्ट गडाच्या वैभवात मोलाची भर घालेल. पर्यटन विभागाच्या निधीतून लेसर शो आणि प्रशस्त बगीचाचे कामही मार्गी लागले आहे, असेही उदयनराजेंनी सांगितले.