महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

पोलिसांच्या अंगावर गाडी घालून रोहन वाघमारे पसार

शाहूपुरी येथील बिल्डर रोहन बाळासाहेब वाघमारेवर १ कोटी ७५ लाख रुपयांचा एसबीआय बँकेला फसवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शाहूपुरी पोलिसांच्या पथकाने त्याला मंगळवार पेठ चौकीत चौकशीसाठी बोलवले होते. दरम्यान, पोलीस त्याच्याकडील कागदपत्रांची पाहणी करत असतानाच वाघमारे अटकेच्या भितीने तेथून पळुन निघाला होता. त्यावेळी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणारे पोलीस उपनिरीक्षक बशीर मुलाणी यांच्या अंगावर कार घालून रोहन पसार झाला.

esahas.com
महाराष्ट्र

पाचवड फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन ठार

कराड तालुक्यात पुणे-बेंगलोर आशियायी महामार्गावर पाचवड फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत सातारा येथील दोन युवक जागीच ठार झाले. गुरुवारी 10 रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

esahas.com
महाराष्ट्र

विनापरवाना खैर लाकडाची वाहतुक करणारा ट्रक ताब्यात

वराडे, ता. कराड गावानजीक पुणे-बेंगलोर आशिया महामार्गावर विनापरवाना खैर प्रजातीची वृक्षतोड करून त्यापासून माल तयार केलेल्या मालाची वाहतुक करणाऱ्यांवर वनविभागाने कारवाई केली. सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी   वनविभागाकडून ही कारवाई मोहीम राबवण्यात आली. त्यामध्ये ट्रकसह ट्रक चालकास वनविभागाने ताब्यात घेतले. तसेच वनविभागाने साडे चार लाखांचा  मुद्देमालही जप्त केला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

साताऱ्यातील महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रमाची आता राज्यभरात अंमलबजावणी!

महिला सुरक्षेचा आधुनिक दृष्टिकोनातून विचार करून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यात महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रम राबविण्यात येत आहे. साताऱ्यात या उपक्रमास मिळालेल्या यशामुळे आता हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे. शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली.

esahas.com
महाराष्ट्र

विजयश्री सन्मान सोहळा उत्साहात

विजय दिवस समारोह समितीच्या वतीने कर्नल संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देण्यात येणारा ‘विजयश्री पुरस्कार’ महिलांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत पुरस्कार प्राप्त महिलांनी व्यक्त केले. जागतिक महिला दिनानिमित्त कला, क्रीडा, साहित्य व वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.

esahas.com
महाराष्ट्र

कराड पंचायत समितीचा शिक्षण महोत्सव संपन्न

कराड पंचायत समितीचा शिक्षण महोत्सव उत्साहात संपन्न झाला. दोन दिवसीय शिक्षण महोत्सवाची शुक्रवारी ११ रोजी सांगता झाली. महोत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे निकाल व पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

esahas.com
महाराष्ट्र

कॉलेजच्या मुलांना मारहाण केल्याप्रकरणी तिघेजण निलंबित

खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचारी व एक होमगार्ड अशा तिघांना निलंबित केले असल्याची माहिती अपर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे यांनी दिली.

esahas.com
महाराष्ट्र

साताऱ्यात गाळा विक्रीत फसवणूक; एकावर गुन्हा

प्रतापगंज पेठ, सातारा येथील स्टेट बँकेच्या शाखेकडून अर्पाटमेंट बांधकाम करण्यासाठी घेतलेले एक कोटी ७५ लाख रूपयांचे कर्ज न फेडताच बँकेच्या परस्पर अर्पाटमेंटमधील चार फ्लॅट व दोन दुकान गाळे विकून बँकेची फसवणुक केली. याप्रकरणी बँकेचे कर्मचारी विवेक कुमार सिन्हा रा. भंडारी एजन्सी, देगाव फाटा यांनी फिर्याद दिली. यानंतर रोहन बाळासाहेब वाघमारे रा. अझादनगर,मोळाचा ओढा सातारा याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

esahas.com
महाराष्ट्र

दुचाकीची चोरी

येथील राधिका रस्त्यावरील ॲक्सीस बॅंकेसमोर लावलेली २0 हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञाताने चोरून नेली. ही घटना दि. ५ रोजी सकाळी नऊच्या सुमारास घडली.

esahas.com
महाराष्ट्र

घंटागाडीच्या टेंडरची भाग्यदृष्टी कोणावर?

सातारा शहराच्या विविध भागांना कचरा संकलनाची सेवा देणाऱ्या घंटागाडीचा निविदेची प्रशासकीय मंजुरी झाल्यानंतर त्याचे टेंडर कोणाच्या झोळीत पडणार, यामध्ये ठेकेदारांच्या पैजा लागल्या आहेत. मात्र अनेकांचे भाग्य उजळून टाकणाऱ्या ठेकेदारासाठी प्रशासकीय पायघड्या घालण्याचे राजकीय मनसुबे रचले जात आहेत.