maharashtra

वासोळे येथील एकाची गळफास लावून आत्महत्या


One commits suicide by hanging in Vasole
वासोळे, ता. सातारा तेथील एकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.

सातारा : वासोळे, ता. सातारा तेथील एकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संदीप सदाशिव नवघणे, वय ४०, रा. वासोळे, ता. सातारा यांनी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास लावून घेतला. ही बाब त्यांच्या कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ त्यांना येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.