वणवा लावल्याप्रकरणी वावरदरे, ता. सातारा येथील महिलेला ५ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास आठ दिवसांचा साधा कारावास अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली.
सातारा : वणवा लावल्याप्रकरणी वावरदरे, ता. सातारा येथील महिलेला ५ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास आठ दिवसांचा साधा कारावास अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. ६ मार्च रोजी राजापुरी, ता. सातारा येथे वन हद्दीत वणवा लागला असल्याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्राप्त होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वन हद्दीत लागलेला वणवा आटोक्यात आणून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या घटनेचा तपास करीत असताना सौ. राधाबाई मारुती जगताप, वय ६०, रा. वावरदरे, ता. सातारा या महिलेने स्वतःच्या मालकी शेतामध्ये बांधावर पालापाचोळा पेटवला असता वाऱ्याने आग पसरून ती वनक्षेत्रात जाऊन वणवा लागल्याचे स्पष्ट झाले. याबाबत संबंधित महिलेला दि. १० मार्च रोजी सातारा येथील न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने तिला ५ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास आठ दिवसांचा साधा कारावास अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली. ही कारवाई सातारा वनपरिक्षेत्र अधिकारी निवृत्ती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने केली.