६५ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेऊन कंपनीची 65 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन वॉचमनवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : ६५ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेऊन कंपनीची 65 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन वॉचमनवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डिसेंबर २०२१ ते ११ मार्च २०२२ या कालावधीत कोडोली, ता. सातारा गावच्या हद्दीत असणाऱ्या नवीन औद्योगिक वसाहतीमधील परफेक्ट हाऊस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत वॉचमन म्हणून काम करणाऱ्या विशाल दत्तात्रय सावंत, रा. अंभेरी, ता. कोरेगाव, हेमंत दिलीपराव कदम, रा. बेलदरे, ता. कराड या दोघांनी संगणमत करून कंपनीतुन ६५ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


