कामाच्या निविदेत दिलेली बँक गॅरंटी खोटी असल्याचे निदर्शनास आल्याने एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
सातारा : कामाच्या निविदेत दिलेली बँक गॅरंटी खोटी असल्याचे निदर्शनास आल्याने एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १५ मार्च २०२१ ते १९ जानेवारी २०२२ पर्यंत राजेंद्रसिंह सोपानराव सूर्यवंशी, रा. आनवली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर यांनी सातारा येथील लघुपाटबंधारे विभागात सादर करण्यात आलेल्या कामाच्या निविदेपोटी जुलै २०२० रोजी ७.२५ लाख रुपयांची आयसीआय बँकेची बँक गॅरंटी खोटी असल्याचे निदर्शनास आले असल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर सूर्यवंशी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.


