समाजासाठी दक्ष असणार्या आणि कर्तव्यावर कायम असणार्या परंतू अडचणीत सापडलेल्या दोन महिला कॉन्स्टेबलना अर्ध्या रात्री मदत करुन शिवबा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा सविता शिंदे यांनी खरोखरीच माणुसकी जिवंत असल्याची चुणूक दाखवून दिली आहे. त्यांच्या या कार्याचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
गोजेगाव ता. जि. सातारा येथील तेजस्विनी भास्कर चव्हाण यांनी सकल मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देता स्वातंत्रपणे आरक्षण द्यावे. या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळातील ज्येष्ठ नेते असलेले भाऊसाहेब सोमण म्हणजे सामाजिक व राजकीय कार्यातील दीपस्तंभ म्हणावे लागेल असे व्यक्तिमत्व होते, असे गौरवोद्गार ज्ञानश्री इन्स्टिट्यूट चे संस्थापक व सहकार चळवळीतील एक अग्रणी भाई ज्ञानेश्वर वांगडे यांनी सातारा येथे एका कार्यक्रमात बोलताना काढले.
कोणीही राजकीय नेत्यांनी मराठा आंदोलनाच्या मंडपात फिरकायचे नाही, अशा शब्दात आमदार शशिकांत शिंदे यांना मराठा आंदोलनकर्त्यानी सुनावत आता तुम्ही काय करणार समाजासाठी ते सांगा, असे प्रश्न विचारुन त्यांना जेरीस आणले.
सातारा तालुका पोलिसांनी पेट्री येथील राज कास हिल रिसॉर्टवर छापा टाकून 21 जणांवर कारवाई केली आहे. यामध्ये गिऱ्हाईके हॉटेल मालक मॅनेजर आणि वेटरचा समावेश आहे.
महिलेच्या पर्समधून अज्ञातांनी तीस हजारांची चोरी केल्याची फिर्याद वाई पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
राहत्या घरातून एक जण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
साडेदहा लाखांच्या फसवणूक प्रकरणी चौघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 133 ग्रामपंचायत पैकी 50 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर 18 ग्रामपंचायती अंशतः बिन विरोध झाल्या आहेत. प्रत्यक्ष निवडणूक 64 ग्रामपंचायतीमध्ये लागली असून थेट सरपंचाच्या 57 पदासाठी 146 जन रिंगणात आहेत. 63 गावातील 380 जागांसाठी 817 उमेदवार रिंगणात असल्याचे ग्रामपंचायत विभागातून सांगण्यात आले.
साताऱ्यातील यशस्वी उद्योजिका सौ. वर्षा राजेश भोसले यांचा नुकताच लायन्स क्लबच्या नवदुर्गा पुरस्काराने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.