maharashtra

बेदरकारपणे रिक्षा चालवल्याप्रकरणी चालकावर गुन्हा


बेदरकारपणे रिक्षा चालवल्याप्रकरणी चालकाविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : बेदरकारपणे रिक्षा चालवल्याप्रकरणी चालकाविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 28 रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पोवई नाका एसटी स्टँड जाणाऱ्या रस्त्यावर राजेंद्र दिनकर शिंदे रा. देगाव, ता. सातारा याने त्याच्या ताब्यातील रिक्षा क्र. एमएच 11 एजी 1558 सार्वजनिक रस्त्यावर भरधाव वेगात चालवल्या प्रकरणी त्याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जगताप करीत आहेत.