maharashtra

तीन गावठी पिस्टल, दोन गावठी कट्ट्यांसह वाघाची नखे व प्राण्याची शिंगे जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची वाई तालुक्यात कारवाई

बावधन तालुका वाई येथील एका इस्माकडून स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून तीन गावठी पिस्टल, दोन गावठी कट्टे, 78 जिवंत काडतुसे, 370 वापरलेल्या काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या, दोन तलवारी, वन्यजीव प्राण्याची शिंगे व वाघाचे नख असा 6 लाख 20 हजार 300े रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सातारा : बावधन तालुका वाई येथील एका इस्माकडून स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून तीन गावठी पिस्टल, दोन गावठी कट्टे, 78 जिवंत काडतुसे, 370 वापरलेल्या काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या, दोन तलवारी, वन्यजीव प्राण्याची शिंगे व वाघाचे नख असा 6 लाख 20 हजार 300े रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अविनाश मोहन पिसाळ असे पोलीस अभिलेखा वरील गुन्हेगाराचे नाव असून स्थानिक गुन्हे शाखा वाई वनविभाग यांनी संयुक्त विद्यमाने ही कारवाई केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना बावधन येथे एका इसमाकडे बेकायदेशीर पिस्तूल असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या अधिपत्याखाली एका विशेष पथकाने बावधन नाका, तालुका वाई येथील पिसाळ यांच्या निवासस्थानावर छापा टाकला. या छाप्यामध्ये तीन गावठी पिस्टल, दोन गावठी कट्टे, 78 जिवंत काडतुसे, 370 वापरलेल्या काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या, दोन तलवारी, प्राण्यांची शिंगे व वाघाचे नख असा 6 लाख 20 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वाई पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 769 नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या गुन्हेगाराकडून वन्यजीव प्राण्याची शिंगे व वाघाची नखे या संदर्भात कसून चौकशी सुरू आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या कारवाईबद्दल तपास पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे. या कारवाईत विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मदन फाळके, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, निलेश फडतरे, सचिन चाळके, प्रवीण फडतरे, सनी आवटे, अमित माने, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, स्वप्निल कुंभार यांनी सहभाग घेतला होता.