विषारी औषध प्राशन केलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद मेढा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : विषारी औषध प्राशन केलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद मेढा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, किसन बाबुराव पिंपरे रा. निपाणी, ता. जावली या वृद्धाने राहत्या घरी विषारी औषध खाल्ल्याने त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची नोंद मेढा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार उदागे करीत आहेत.


