दोघांना मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : दोघांना मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शुभम वाल्मीक गायकवाड रा. कृष्णा नगर, सातारा आणि त्याचा मित्र प्रकाश राम चलवादी यास लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी रोहन (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) आणि त्याच्या सोबतचे सात ते आठ जण यांच्या विरोधात सातार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक भोंडवे करीत आहेत.


