maharashtra

एकास जखमी केल्याप्रकरणी ॲम्बुलन्स चालकाविरोधात गुन्हा


एका रिक्षा चालकास जखमी केल्याप्रकरणी ॲम्बुलन्स चालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : एका रिक्षा चालकास जखमी केल्याप्रकरणी ॲम्बुलन्स चालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी रात्री 9 वाजता रहिमतपूर-सातारा रस्त्यावर अफजल उस्मान सय्यद रा. सातारा हे त्यांच्याकडील रिक्षा क्र. एमएच 11 सीजे 3555 मधून सातारा कडे जात असताना ॲम्बुलन्स क्र. एमएच 11 डीडी 0105 वरील चालक सचिन काशिनाथ बाबर रा. वाठार किरोली, ता. कोरेगाव याने ॲम्बुलन्स भरधाव वेगात चालवून सय्यद यांच्या रिक्षाला समोरून जोराची धडक दिल्याने सय्यद हे गंभीर जखमी झाले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार कारळी करीत आहेत.