शेअर मार्केटच्या माध्यमातून चांगले पैसे मिळवून देते, असे सांगून फसवणूक करणार्या शकुंतला अरुण गायकवाड (वय 26, रा. सदरबझार) या महिलेला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी युनूस पठाण यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. दरम्यान, महिलेला अटक करुन न्यायालयात हजर केले असता दि. 7 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
प्रतापसिंहनगर येथे अज्ञात तिघांनी एकाला अडवून त्याच्याकडील रोख 47 हजार रुपयांची रोकड लुटल्या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संजय किसन निकम (वय 52, रा. निकमवाडी पो.अंबेदरे ता.सातारा) यांचा आरे ता.सातारा गावच्या हद्दीत झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
भारतीय सैनिक दलाचा बनावट युनिफॉर्म, ओळखपत्र वापरून अधिकारी असल्याचे भासवून युवकांना सैन्य दलात नोकरी लावतो असे आम्ही दाखवून त्यांची फसवणूक करणाऱ्या तोतया सैनिक अधिकाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
महाराष्ट्र केसरी विजेते मल्ल जे आहेत. ते आपले करिअर मल्लविद्येत घालवत असतात. त्यानंतर त्यांच्या उतारवयात त्यांच्या पेन्शनच्या बाबतीत राज्यशासनाने धोरण ठरविण्याची वेळ आली आहे. याबाबत या स्पर्धेसाठी ना. शंभुराज देसाई, सहकार मंत्री व पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे दोन कॅबिनेट मंत्री सुदैवाने उपस्थित आहेत.
सातारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दणकेबाज महसूल जमा करीत शासनाच्या तिजोरीत 123.23 कोटी रुपयांची भर टाकली आहे.
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा, आम्ही त्यातून चांगले पैसे मिळवून देतो, असे सांगून सुमारे 1 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शंकुतला गायकवाड (रा. सदरबझार) या महिलेविरुध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दौलतनगर येथे कॉंक्रिट रोडचे काम सुरु असताना त्या मशीनचा शॉक लागल्याने कमलेश चंद्रशाह जांगी (वय 27, रा.रांगी जि.गडचिरोली, सध्या रा.मोळाचा ओढा, सातारा) या युवकाचा मृत्यू झाला.
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पती अजित शिंदे, संगीता शिंदे, रुपाली शिंदे, तुषार शिंदे, तेजस्विनी अडसुळ (सर्व रा. संभाजीनगर, सातारा) यांच्याविरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सौ.सोनाली अजित शिंदे (वय 28, रा.संभाजीनगर, सातारा) यांनी तक्रार दिली आहे.
शिवी का दिली, असे म्हणत चौघांनी एकाला मारहाण केली. याप्रकरणी सौरभ सावंत, आकाश सावंत, मयुर सावंत, प्रज्वल सावंत (सर्व रा.चतुरबेट, लिंब, सातारा) यांच्या विरुध्द अनिकेत दादासो जाधव (वय 21, रा.कोडोली) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.