विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पती अजित शिंदे, संगीता शिंदे, रुपाली शिंदे, तुषार शिंदे, तेजस्विनी अडसुळ (सर्व रा. संभाजीनगर, सातारा) यांच्याविरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सौ.सोनाली अजित शिंदे (वय 28, रा.संभाजीनगर, सातारा) यांनी तक्रार दिली आहे.
सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पती अजित शिंदे, संगीता शिंदे, रुपाली शिंदे, तुषार शिंदे, तेजस्विनी अडसुळ (सर्व रा. संभाजीनगर, सातारा) यांच्याविरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सौ.सोनाली अजित शिंदे (वय 28, रा.संभाजीनगर, सातारा) यांनी तक्रार दिली आहे.
ही घटना दि. 21 फेब्रुवारी 2022 ते 17 मार्च 2022 या कालावधीत वेळोवेळी घडली आहे. संशयितांनी माहेरहून सोने आण, असे म्हणत इतर विविध कारणातून विवाहितेचा छळ केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


