शिवी का दिली, असे म्हणत चौघांनी एकाला मारहाण केली. याप्रकरणी सौरभ सावंत, आकाश सावंत, मयुर सावंत, प्रज्वल सावंत (सर्व रा.चतुरबेट, लिंब, सातारा) यांच्या विरुध्द अनिकेत दादासो जाधव (वय 21, रा.कोडोली) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
कमी व्याजदराने कर्ज देतो, असे आमिष दाखवून सुमारे पाच जणांची फसवणूक केल्या प्रकरणी कोमल भिसे, अनिता पाटील उर्फ राणी गालफाडे या दोघींना सातारा शहर पोलिसांनी अटक केली. संशयित दोन्ही महिलांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी मिळाली आहे.
एकीकडे पेट्रोल व डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत तर दुचाकी, चारचाकी ई-वाहनांसाठी खरेदीमध्ये मोठी सवलत मिळत असून इलेक्ट्रिक चार्जिंगद्वारे स्वस्त इंधन देखील उपलब्ध होत आहे. त्यामुळे ई-वाहनांचा वापर ही काळाची गरज झाली आहे, असे मत राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केले.
हद्दपारीचे उल्लंघन करून शहरात फिरणार्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) कर्मचार्यांनी अटक केली.
कलिंगडचे उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून फळविक्रेत्याला तिघांनी मारहाण केली.
जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदिवानांमध्ये राडा झाला असतानाच बंदिवानाने कारागृहातील ट्यूबलाइट आणि सीसीटीव्हीची तोडफोड करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचे समोर आले. यानंतर कारागृह प्रशासनाने तोडफोड करणार्या बंदिवानावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
जळगाव ता. कोरेगाव येथील वैभव विकास ढाणे यांच्या खूनप्रकरणी गावातीलच पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
तब्बल 61 वर्षांच्या कालखंडानंतर महाराष्ट्र केसरीचा फड साताऱ्याच्या छत्रपती शाहू क्रीडा संकुलामध्ये मंगळवार पासून रंगणार आहे. या तालमी मध्ये तब्बल 900 मल्ल 45 संघामधून एकमेकांशी झुंजणार असून गादी आणि माती विभागातील वजन 57 ते 125 किलो च्या गटांमध्ये विजेत्यांना तब्बल 33 लाख रुपयांचे मानधन दिले जाणार आहे.
छ शाहू स्टेडियममध्ये ५ एप्रिल पासून रंगणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. संकुलामध्ये दोन मातीचे व तीन मॅटचे आखाडे वनविण्यात आले असून राज्यभरातील नऊशे मल्ल या आखाडयात मानाच्या गदेसाठी झुंजणार आहेत. कुस्तीपट्टू व प्रशिक्षक अशा एकूण अकराशे जणांसाठी क्रीडा संकुलामध्ये निवास व क्रीडा सुविधा उभारल्या जात आहेत.
सातारा पालिकेच्या लेखा विभागाने मार्च एण्डची गडबड रात्री दीड वाजता संपविल्याचे वृत्त आहे. नवीन आणि जुन्या रकमांची वर्गावर्गी आणि जुन्या देण्यांचा तपशील पूर्ण करून मार्च एंडचे क्लोजिग होण्यास कर्मचाऱ्यांना मध्यरात्र उजाडली. पालिकेच्या या मॅरेथॉन कामाचे कौतुक होत आहे असून लेखा विभागाला यंदा 19 कोटीचा महसूल प्राप्त झाला आहे.