कलिंगडचे उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून फळविक्रेत्याला तिघांनी मारहाण केली.
सातारा : कलिंगडचे उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून फळविक्रेत्याला तिघांनी मारहाण केली.
सचिन सुपेकर (कमानी हौदाजवळ, सातारा), सचिन अशोक गायकवाड (रा. व्यकंटपुरा पेठ, सातारा), अजय गायकवाड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अरशद राजू बागवान (वय 29, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) हे फळविक्रेते असून त्यांनी वरील संशयितांना अडीच हजार रुपयांची कलिंगड उधारीवर दिली होती. याचे पैसे मागण्यासाठी बागवान गेले असता संशयितांनी फळविक्रेते बागवान यांच्या डोक्यात लोखंडी पार्इप मारून त्यांना गंभीर जखमी केले.


