maharashtra

चौघांनी केली एकाला मारहाण


The four beat one
शिवी का दिली, असे म्हणत चौघांनी एकाला मारहाण केली. याप्रकरणी सौरभ सावंत, आकाश सावंत, मयुर सावंत, प्रज्वल सावंत (सर्व रा.चतुरबेट, लिंब, सातारा) यांच्या विरुध्द अनिकेत दादासो जाधव (वय 21, रा.कोडोली) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सातारा : शिवी का दिली, असे म्हणत चौघांनी एकाला मारहाण केली. याप्रकरणी सौरभ सावंत, आकाश सावंत, मयुर सावंत, प्रज्वल सावंत (सर्व रा.चतुरबेट, लिंब, सातारा) यांच्या विरुध्द अनिकेत दादासो जाधव (वय 21, रा.कोडोली) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
ही घटना दि. 2 एप्रिल रोजी लिंब येथील आवळा माथा येथे घडली आहे. शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी काठी, दगडाने मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.