maharashtra

कर्जाच्या आमिषाने दोन महिलांनी केली पाच जणांची फसवणूक


Two women cheat five people with the lure of debt
कमी व्याजदराने कर्ज देतो, असे आमिष दाखवून सुमारे पाच जणांची फसवणूक केल्या प्रकरणी कोमल भिसे, अनिता पाटील उर्फ राणी गालफाडे या दोघींना सातारा शहर पोलिसांनी अटक केली. संशयित दोन्ही महिलांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी मिळाली आहे.

सातारा : कमी व्याजदराने कर्ज देतो, असे आमिष दाखवून सुमारे पाच जणांची फसवणूक केल्या प्रकरणी कोमल भिसे, अनिता पाटील उर्फ राणी गालफाडे या दोघींना सातारा शहर पोलिसांनी अटक केली. संशयित दोन्ही महिलांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी मिळाली आहे.
कोमल सनी भिसे (वय 26, रा.गणेश प्लाझा, देगाव रोड), अनिता पाटील उर्फ राणी किशोर गालफाडे (वय 42, रा. क्षितिजा अपार्टमेंट, शाहूपुरी) अशी संशयित आरोपी महिलांची पूर्ण नावे आहेत. याप्रकरणी स्वाती राजकुमार साळुंखे (रा.संभाजीनगर, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार महिलेसह आणखी पाच जणांची फसवणूक झालेली आहे. संशयित महिलांनी 4 टक्के व्याजाने कर्ज देतो, असे सांगितले. त्यानुसार प्रोसेसिंग फी सह इतर विविध कारणे सांगून तक्रारदारांसह इतरांकडून गुगल पे, आरटीजीएस, चेकद्वारे सुमारे 6 लाख 7 हजार 500 रुपये घेतले. कर्ज मिळेल या आशेवर असताना तक्रारदार यांना कर्ज मिळाले नाही. त्यांनी दिलेले पैसे परत मागितल्यावर ते पैसही मिळत नसल्याने अखेर तक्रारदारांनी शहर पोलिस ठाणे गाठले व तक्रार दिली.