maharashtra

कारागृहामध्ये तोडफोड करणार्‍या बंदिवानावर गुन्हा


Crime against a prisoner
जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदिवानांमध्ये राडा झाला असतानाच बंदिवानाने कारागृहातील ट्यूबलाइट आणि सीसीटीव्हीची तोडफोड करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचे समोर आले. यानंतर कारागृह प्रशासनाने तोडफोड करणार्‍या बंदिवानावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

सातारा : जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदिवानांमध्ये राडा झाला असतानाच बंदिवानाने कारागृहातील ट्यूबलाइट आणि सीसीटीव्हीची तोडफोड करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचे समोर आले. यानंतर कारागृह प्रशासनाने तोडफोड करणार्‍या बंदिवानावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
विकास भिमराव बैले (वय 30, रा. कुशी, ता. पाटण) असे गुन्हा दाखल झालेल्या बंदिवानाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विकास बैले हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून, त्याला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहे. शनिवारी त्याने एका बंदिवानाला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर सलग दुसर्‍या दिवशी त्याने पुन्हा कारागृहात धुडगूस घातला. टॉयलेट स्वच्छ करण्याच्या ब्रशने त्याने ट्यूबलाइट फोडून खोलीच्या दरवाजावर तो चढला. त्यानंतर त्याने सीसीटीव्ही फोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. या प्रकारानंतर कारागृहातील पोलीस हवालदार प्रभाकर माळी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.