maharashtra

हद्दपारीचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकास अटक


One arrested for deportation violation
हद्दपारीचे उल्लंघन करून शहरात फिरणार्‍या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) कर्मचार्‍यांनी अटक केली.

सातारा : हद्दपारीचे उल्लंघन करून शहरात फिरणार्‍या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) कर्मचार्‍यांनी अटक केली.
दत्तायत्र उत्तम घाडगे (वय 32, रा. सूर्यवंशी कॉलनी, दौलतनगर, सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. दत्तात्रय घाडगे याला सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे, असे असताना तो दि. 2 रोजी दुपारी दीड वाजता शाहू स्टेडियमजवळीलएका पानटपरीजवळ लपून बसला होता. यावेळी स‘थानिक गुन्हे शाखेचे पोलिस गस्त घालत असताना त्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.