शेअर मार्केटच्या माध्यमातून चांगले पैसे मिळवून देते, असे सांगून फसवणूक करणार्या शकुंतला अरुण गायकवाड (वय 26, रा. सदरबझार) या महिलेला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी युनूस पठाण यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. दरम्यान, महिलेला अटक करुन न्यायालयात हजर केले असता दि. 7 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
सातारा : शेअर मार्केटच्या माध्यमातून चांगले पैसे मिळवून देते, असे सांगून फसवणूक करणार्या शकुंतला अरुण गायकवाड (वय 26, रा. सदरबझार) या महिलेला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी युनूस पठाण यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. दरम्यान, महिलेला अटक करुन न्यायालयात हजर केले असता दि. 7 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
संशयित महिलेने आणखी दोघांना अशाप्रकारे फसवले असल्याचेही समोर आले. यामुळे आणखी कोणाची फसवणूक झाली असेल तर शाहूपुरी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन शाहूपुरी पोलिसांनी केले आहे. याचा तपास सहाय्यक फौजदार जगदाळे करत आहेत.