womanarrestedinfinancialfraudcase

esahas.com

आर्थिक फसवणूक प्रकरणी महिलेला अटक

शेअर मार्केटच्या माध्यमातून चांगले पैसे मिळवून देते, असे सांगून फसवणूक करणार्‍या शकुंतला अरुण गायकवाड (वय 26, रा. सदरबझार) या महिलेला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी युनूस पठाण यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. दरम्यान, महिलेला अटक करुन न्यायालयात हजर केले असता दि. 7 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.