प्रतापसिंहनगर येथे अज्ञात तिघांनी एकाला अडवून त्याच्याकडील रोख 47 हजार रुपयांची रोकड लुटल्या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : प्रतापसिंहनगर येथे अज्ञात तिघांनी एकाला अडवून त्याच्याकडील रोख 47 हजार रुपयांची रोकड लुटल्या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी आकाश शिवाजी क्षिरसागर (वय 27, रा. खेड) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून ते देशी दारु दुकानावर मॅनेजर आहेत. ही घटना दि. 3 रोजी रात्री 10 वाजता घडली असून संशयितांनी रस्ता अडवून दुचाकीवरुन पाडून रोकड जबरदस्तीने चोरुन नेले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


