तंत्रज्ञान कंपनी, कॉन्टिनेंटलने पुणे येथे ग्रीनफिल्ड प्लांटचे उद्घाटन केले. हा प्लांट भारताच्या ऑटोमोटिव्ह आणि टू-व्हीलर मार्केटसाठी सरफेस सोल्युशन्स मटेरियल तयार करेल. सुविधा आणि यंत्रसामग्रीमध्ये INR 2 अब्ज (20 दशलक्ष युरोपेक्षा जास्त) गुंतवणुकीसह, कॉन्टिनेन्टल प्रामुख्याने देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यातीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, इलेक्ट्रिक वाहनांसह, कार इंटिरियर आणि दुचाकी सीटसाठी प्रीमियम पृष्ठभाग सामग्री तयार करेल.
सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय समोर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. आयएनएस विक्रांत या लढाऊ युद्ध नौका जेव्हा नौदलाची सेवा पूर्ण करून बाहेर पडली त्या वेळेस तिला वाचवून तीच संग्रहालय करायचं, स्मारक करायचं असे सांगून सोमय्या यांनी देशातील नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांचा निधी जमा केला. सोमय्या यांनी देशभावनेचा अपमान केला असून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी केली
प्राज्ञपाठशाळा मंडळाने तयार केलेले ग्रंथ व खंड हे राष्ट्रासाठी दिशादर्शक असून प्राज्ञपाठशाळेच्या विकासासाठी शासनाकडून निधी दिला जाईल अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
तापोळा, ता. महाबळेश्वर येथील धर्तीवर ठोसेघर, ता. सातारा येथे वन विभागाच्या माध्यमातून धबधबा परिसरात पर्यटकांसाठी निवासी टेन्ट (तंबु) उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यावर युद्धपातळीवर अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे येत्या १५ ते २० दिवसात पर्यटकांना टेन्टमध्ये राहण्यासह वन विभागाच्या वाहनातून जंगल सफारीचा आनंद लुटता येणार आहे.
शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी तीन महिलांना सहा महिने साधी कैद अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली.
येथील जुना आरटीओ चौक ते वाढे फाटा मार्गावर दुचाकी इलेक्ट्रिक खांबाला धडकून झालेल्या अपघातात एक युवती जखमी झाल्याची घटना घडली.
घरगुती कारणावरून झालेल्या भांडणाचे टेन्शन आल्यामुळे दुधी, ता. कोरेगाव येथील दाम्पत्याने विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडली.
लिंब, ता. सातारा गावच्या हद्दीत अपघातात दाम्पत्य व त्यांच्या मुलाला जखमी केल्याप्रकरणी अज्ञात दुचाकी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
सातारा जिल्हा तालीम संघाच्या उभारणीमध्ये अनेक नामवंत मल्लांचे योगदान आहे. यामध्ये ऑलम्पिक वीर दिवंगत पैलवान श्रीरंग जाधव यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांच्या स्वागत कमानीला विरोध करणे म्हणजे आमच्या दैवताला विरोध करण्यासारखे आहे. साहेबराव पवार आणि त्यांच्या दोन चिरंजीवांनी सातारा जिल्हा तालीम संघाच्या राजकीय आखाडा केला आहे. ही मक्तेदारी आम्ही निश्चितच मोडून काढू. पण ज्यांनी आयुष्यात कधीही कुस्ती खेळली नाही त्यांनी आम्हाला वस्तादगिरी शिकवू नये, असा जोरदार घणाघात पैलवान श्रीरंग आप्पा जाधव यांचे चिरंजीव वनराज जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला.