maharashtra

दुचाकी इलेक्ट्रिक खांबाला धडकून युवती जखमी


The girl was injured when the two-wheeler hit an electric pole
येथील जुना आरटीओ चौक ते वाढे फाटा मार्गावर दुचाकी इलेक्ट्रिक खांबाला धडकून झालेल्या अपघातात एक युवती जखमी झाल्याची घटना घडली.

सातारा : येथील जुना आरटीओ चौक ते वाढे फाटा मार्गावर दुचाकी इलेक्ट्रिक खांबाला धडकून झालेल्या अपघातात एक युवती जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संजीवनी सुधीर झांजुर्णे, वय १८, रा. मयुरेश्वर कॉलनी, सदरबझार, सातारा ही युवती दुचाकीवरून जुना आरटीओ चौक ते वाढे फाटा मार्गावरून जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी इलेक्ट्रिक खांबाला धडकून झालेल्या अपघातात जखमी झाली. तिच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.