maharashtra

घरगुती वादातून दाम्पत्याने केले विषारी औषध प्राशन


The couple used poisonous drugs in a domestic dispute
घरगुती कारणावरून झालेल्या भांडणाचे टेन्शन आल्यामुळे दुधी, ता. कोरेगाव येथील दाम्पत्याने विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडली.

सातारा : घरगुती कारणावरून झालेल्या भांडणाचे टेन्शन आल्यामुळे दुधी, ता. कोरेगाव येथील दाम्पत्याने विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दुघी ता. कोरेगाव येथील तुषार लालासाहेब लाड, वय ३७, सौ. काजल तुषार लाड, वय २१ या दाम्पत्याचे घरगुती कारणावरून भांडण झाले. त्या भांडणाचे टेन्शन घेऊन दोघांनी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.