maharashtra

अपघातात तिघांना जखमी केल्याप्रकरणी अज्ञात दुचाकी चालकावर गुन्हा


Unidentified two-wheeler driver injured person in accident
लिंब, ता. सातारा गावच्या हद्दीत अपघातात दाम्पत्य व त्यांच्या मुलाला जखमी केल्याप्रकरणी अज्ञात दुचाकी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सातारा : लिंब, ता. सातारा गावच्या हद्दीत अपघातात दाम्पत्य व त्यांच्या मुलाला जखमी केल्याप्रकरणी अज्ञात दुचाकी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१ एप्रिल रोजी सात वाजण्याच्या सुमारास लिंब, ता. सातारा येथील गौरीशंकर महाविद्यालयासमोर सेवा रस्त्यावर अज्ञात इसमाने आपल्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने चालवून अजय विश्वास अडागळे, वय २६, रा. लिंब यांच्या दुचाकीला समोरून धडक देऊन त्यामध्ये त्यांच्यासह त्यांची पत्नी व मुलाला जखमी केल्याप्रकरणी अज्ञात दुचाकी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.