विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
सातारा : विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २८ एप्रिल २०१७ ते दि. १४ जानेवारी २०२२ पर्यंत पेझारी, ता. अलिबाग, जि. रायगड व डोंबिवली, ता. कल्याण येथे पल्लवी पंकज पाटील, वय ३७ सध्या रा. करंजे तर्फ सातारा या विवाहितेला पती पंकज अरुण पाटील त्याने पैशाची मागणी केली असता तिने नकार दिल्याने तिला मारहाण केली. सासू स्नेहल अरुण पाटील सासरे अरुण काशिनाथ पाटील ननंद माधवी महेंद्र पाटील, भक्ती अरविंद पाटील यांनी शिवीगाळ करून मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास दिल्याची तक्रार विवाहितेने शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिल्यानंतर संबंधित पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.


