पुणे-सातारा महामार्गा वरुन सातारच्या दिशेने भरघाव वेगात येणार्या सातारा पोलीस दलातील शासकीय वाहन असलेली पोलीस व्हॅन हि गुरुवार दि.7 रोजी ससेवाडी गावच्या हद्दीतील डल्बु.एम.ओ. कंपनीसमोर आली. तेथे दुभाजकाला जावुन धडकुन झालेल्या भीषण अपघातात तीन पोलीस जखमी झाले आहेत.
वाहतूक नियंत्रण शाखेतील वाहतूक पोलीस अंमलदार अमर काशिद पोवई नाका, सातारा येथे कर्तव्य बजावत असताना रस्त्याच्या कडेला एक ओपो कंपनीचा मोबाईल बेवारस स्थितीत पडलेला आढळून आला. मोबाईलची तपासणी केली असता मोबाईल मधील सिमकार्ड वरुन हा मोबाईल केन्नी आतनी पाथापील्ली मुळ रा. केरळ सध्या रा. वेणेगाव फाटा खोडद निरसराळे ता.जि. सातारा यांचा असल्याची खात्री करुन मोबाईलचे मुळ मालक यांच्या ताब्यात दिला.
महाबळेश्वर, कोयना बॅक वॉटर येथील पर्यटन विकासासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केलेली आहे. आगामी काळात या भागातील पर्यटन आणखी वाढावे, या उद्दिष्टाने विकास साधला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुकी बिचारी जनता, कुणीही हाका... या म्हणीचा प्रत्यय सध्या सातारा शहर परिसरात पाहायला मिळत आहे. नेत्यांचा वाढदिवस असो किंवा एखाद्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार असो. भव्य फ्लेक्स, कट आउट उभारला गेलाच पाहिजे. आणि त्यातही अपेक्षा अशी की तुझ्यापेक्षा माझा फ्लेक्स मोठा लागला पाहिजे. या चकमकीतून सातारा शहर परिसरात मोकळी जागा सध्या नजरेपुढे पाहायला मिळणे अवघड झाले आहे.
महागाव ता. सातारा गावात राहत असलेल्या एका २७ वर्षीय तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
शहरातील नगर वाचनालयाच्या पार्किंगमध्ये मिळून आलेल्या एका अनोळखी ५५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
देगांव ता. सातारा गावच्या हद्दीत राहत असलेले नितीन बबन कुंभार वय ४० यांच्या राहत्या घरात घुसून साहित्य, फर्निचर, शेतातील अवजारे, अन्न धान्य बाहेर फेकून दिले. या प्रकरणी ४ जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
एक अतिशय धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने चक्क घोरपडीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गोठणे येथील गाभा क्षेत्रात शस्त्रास्त्रांसह फिरणाऱ्या तीन आरोपींपैकी एकाने हे घृणास्पद कृत्य केलं आहे. या प्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस कोठडीतील आरोपींपैकी एका आरोपीने चक्क घोरपडीवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती मोबाईल वरील रेकॉर्डवरून वनाधिकाऱ्यांना मिळाली.
पाटण तालुक्यात मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. तालुक्यात आणि जिल्ह्यात पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखणे गरजेचे आहे. मात्र, पाटण तालुक्यासह जिल्ह्यात पोलिसांचा धाकच राहिलेला नाही. अशा अत्याचार करणाऱ्या लोकांना पकडून त्यांना गजाआड करावे, अशी अपेक्षा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे.
तंत्रज्ञान कंपनी, कॉन्टिनेंटलने पुणे येथे ग्रीनफिल्ड प्लांटचे उद्घाटन केले. हा प्लांट भारताच्या ऑटोमोटिव्ह आणि टू-व्हीलर मार्केटसाठी सरफेस सोल्युशन्स मटेरियल तयार करेल. सुविधा आणि यंत्रसामग्रीमध्ये INR 2 अब्ज (20 दशलक्ष युरोपेक्षा जास्त) गुंतवणुकीसह, कॉन्टिनेन्टल प्रामुख्याने देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यातीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, इलेक्ट्रिक वाहनांसह, कार इंटिरियर आणि दुचाकी सीटसाठी प्रीमियम पृष्ठभाग सामग्री तयार करेल.